Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP Majha

Continues below advertisement

Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP Majha

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार, माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्याने आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही.

कोल्हापुरात गाईचे दूध खरेदी दरातील कपात मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक, पंचगंगा नदीमध्ये दूध ओतून शेतकऱ्यांचं आंदोलन, पश्चिम महाराष्ट्रात दूध संघाकडून दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात.

परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक. कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार.शेतकऱ्यांनी आज आपला शेतीमाल विक्रीला न आणण्याचं समितीच्या सचिवांचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईशी आम्ही सहमत नाही. फरार तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करा. आणि बीडच्या एसपींना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केलीय.  

भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक, नवीन सरकार आल्यानंतर भाजपची पहिली पक्षीय बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन.

नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवल स्पर्धांना आजपासून सुरुवात होणार. या स्पर्धा दोन दिवस चालणार. स्पर्धांसाठी देशभरातील नामांकित अश्व सहभागी होणार.  

अमरावतीत महानुभाव आश्रमाचा शतकपूर्वी महोत्सव, यावेळी भव्य शोभायात्रा निघाली, राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक शोभायात्रेत सहभागी.

विविध आंदोलन आणि मोर्चांमध्ये बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांसाठी नागपुरात सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा. पोलिसांच्या ड्युटीचे तास कमी करा ही मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी. 

वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासकीय, तसेच पदोन्नती बदल्यांच्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन. अहिल्यानगरच्या स्टेट बँक चौकातील मुख्य कार्यालयबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केली निदर्शने.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram