Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी मोठा झटका बसला. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केज सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला काल (14 जानेवारी) पुन्हा एकदा बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांच्यावतीने युक्तीवाद झाला. यामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणखी बऱ्याच गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. वाल्मिक कराडची राज्याबाहेर कुठे संपत्ती आहे, त्याचाही तपास बाकी आहे. पोलिसांकडून संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच्याभोवतीचा फास आवळताय. त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणे आता अवघड आहे.