Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha
सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल
सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर.
चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार.
हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग.
भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती.
पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान.
पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.