Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :25 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :25 ऑगस्ट 2024 : ABP Majha
गेल्या काही तासांपासून धुवांधार कोसळत असलेल्या पुण्यातील पावसाचा जोर आगामी तासांमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही तासांमध्ये खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरु आहे. परिणामी खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीच्या पात्रात वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला धरणातून साधारण 35,310 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग २३ १२२ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, तरीही भिडे पूलाजवळ पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून भिडे पूलाजवळ जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढल्यास खडकवासलातून पाणी सोडण्याचा वेग वाढवला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास पुणे शहर आणि जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.