Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6AM : 11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6AM : 11 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यात आज (दि.10) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांना पदावरून पायउतार केल्यामुळं नाराज पदाधिकाऱ्यांनी बंड केलं आहे. विश्वास न घेता पदावरुन काढलं, प्रदीप राऊत यांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदार संघाची प्रमुख जबाबदारी होती. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार ही निवडून आले. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून काढून त्यांच्यावर प्रदेश संघटन सचिव ही नवी जबाबदारी देण्यात आली. मला विश्वासात न घेता आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढलं, अशी नाराजी प्रदीप राऊत यांनी व्यक्त केली. पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अवमान असल्यामुळं मी राजीनमा देतोय : प्रदीप राऊत आपल्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला, त्यासाठी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विधानसभेचे माजी उपसभापती शरद तसरे, प्रकाश बोंडे हे नेते जबाबदार असल्याचा आरोपही प्रदीप राऊत यांनी केला. कुठलंही कारण न देता किंवा चर्चा न करता आपल्याला पदावरून काढून टाकलं. हा आपल्या पक्षनिष्ठेचा आणि कार्याचा अवमान असल्यामुळं आपण प्रदेश संघटना सचिव पदाचा राजीनामा देत आहोत, असं प्रदीप राऊत यांनी सांगितलं. प्रदीप राऊत यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे जिल्हाध्यक्ष किशोर बर्डे, सामाजिक न्याय विभागाचे सुनील कीर्तनकार आदी पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत.