Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 08 AM : 13 जुलै 2024: ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 08 AM : 13 जुलै 2024: ABP Majha

आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकारने घेतलेली वेळ आज संपली,  

जरांगेंच्य़ा शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर छ. संभाजीनगरमधील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी, संभाजीनगरमधील ६०० शाळा, ५० कॉलेज राहणार बंद

मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरे अध्यादेश काढला तर मुंबई जाम करु, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा. 

मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि सीमा खोतकर सहभागी, जालन्यात निघालेल्या शांतता रॅलीत खोतकरांसह हजारो महिलांची घोषणाबाजी. 

नांदेडमध्ये उपोषण करणाऱ्या रामचंद्र भरांडेंसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करा, या मागणीसाठी १२ दिवसांपासून उपोषण सुरू.

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर दोषी आढळून आल्यास त्यांना IAS पदावर रूजू होऊ दिले जाणार नाही, तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार,  केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram