Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 20 डिसेंबर 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 20 डिसेंबर 2024 : ABP Majha
तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो असं म्हणत गुंडांकरवी मराठी भाषिकांना मारहाण केलेल्या अखिलेश शुक्ला या व्यक्तीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. एमटीडीसीमध्ये अकाऊंट मॅनेजरपदावर कार्यरत असणारा हा व्यक्ती खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आलं आहे. तसेच सोसायटीतील नागरिकांना तो IAS अधिकारी असल्याचं सांगायचा आणि अरेरावी करायचा अशी माहिती समोर आली आहे. मराठी भाषिकांना मारहाण प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलिस आता या प्रकरणाचा तपास करणार आहेत. ज्या खासगी गाडीवर अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र शासनाचा अंबर दिवा लावून फिरायचा त्या गाडीचा इन्शुरन्सही 10 मार्च 2020 रोजी संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळंच बेकायदेशीर वागणाऱ्या या हिंदी भाषिक अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला हा त्याच्या खाजगी वाहनाला अंबर दिवा लावत आल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.