Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हा
बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार,जितेंद्र आव्हाड, वड्डेटीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार.
संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच धनंजय मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावर शिजला, वाल्मिक कराड, पवनचक्की मॅनेजर, नितीन भिक्कड यांच्यात बैठक झाली, बैठकीत ३ कोटीचं डील, सुरेश धस यांचा दावा.
सरपंच हत्या प्रकरण, एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेची कसून चौकशी, हत्येनंतरचा घटनाक्रम आरोपींनी एसआयटीला सांगितला.
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधील अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? आव्हाडांचा सवाल.
जितेंद्र आव्हाडांचा शिवलिंग मोराळेंवर निशाणा, धनंजय मुंडेंच्या आशीर्वादामुळे मोराळे ९ वर्षे अधिकारी, त्यामुळे ते काय चौकशी करणार, आव्हाडांचा सवाल.
पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप, दिवसाला ७०० ते ८०० फोन कॉल येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य
वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली, गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली, खासदार बजरंग सोनवणेंबद्दल केली होती वादग्रस्त पोस्ट.