Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 12 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगेंच्या आज आंदोलनाचा पाचवा दिवस. पाचव्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली, त रात्री जरांगेंवर उपचार,जरांगे यांची शुगर आणि बीपी डाऊन असल्याची माहिती.
संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरेंनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत जात भेट घेतली, मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आंदोलन सुरु.
मनोज जरांगेंच्या उपोषणाला राज्य सरकारने बळी पडू नये, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी समाजाचा विरोध, १८ तारखेपासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाज आंदोलन करणार, प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य.
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं मराठा आरक्षण प्रश्नी सरकाराला पत्र, मराठा समाजाला न्याय मिळावा यासह जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यांसदर्भात पत्रातून उल्लेख.
मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करा अन्यथा दोन दिवसात हिंगोली जिल्ह्यात आंदोलन करू, मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा.
सोलापूर बार्शी महामार्गांवर वैराग येथे मराठा बांधवांचा रास्ता रोको. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आंदोलन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा.