Majha Gaon Majha Bappa : माझं गाव, माझा बाप्पा : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 07 Sep 2024

Majha Gaon Majha Bappa : माझं गाव, माझा बाप्पा : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 07 Sep 2024
सिंहाच्या रथातून  पुण्यातल्या दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक,  बाप्पासाठी यंदा  जटोली शिव मंदिराचा देखावा.. 
आज सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह, पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंडपात पहाटेपासून भाविकांची गर्दी.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी, पहाटे लालबागच्या राजाची पारंपारिक पद्धतीने पूजा, त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरूवात.
चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्रतिष्ठापना आणि आरती संपन्न.
यंदाचं चिंतामणीचं हे 105 वं वर्ष,  यंदा या मंडळाने जगन्नाथ पुरी मंदिराचा देखावा साकारला.
पुण्यातील श्रीमंत भाऊरंगारी गणपतीची मिरवणूक, मिरवणुकीत कलावंत ढोलताशा पदकाचं वादन, अभिनेता सिद्धार्थ जाधवही ढोल ताशा पथकात सहभागी. 
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची जल्लोषात मिरवणूक, मिरवणुकीत सहभागी झालेल्या संघर्ष पथकाकडून स्त्री संरक्षणाचा संदेश.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची मिरवणूक संपन्न, पारंपारिक पद्धतीनं पालखीत तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान, वाद्यांच्या तालात गणपतीचं आगमन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola