Majh Gav Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा : 15 सप्टेंबर 2024 : 10 AM : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajh Gav Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा : 15 सप्टेंबर 2024 : 10 AM : ABP Majha
एबीपी माझाच्या महागणेशमंडळ स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील पातुर च्या श्री. खडकेश्वर गणेश मंडळांना बाजी मारलीये. श्री खडकेश्वर गणेश मंडळाला त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमासाठी हा पुरस्कार देण्यात आलाये. मंडळाने यावर्षी जुन्या देशी खेळांना चालना देण्यासाठी गणपतीचे दहा दिवस या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्याय. कबड्डी, खो-खो, लंगडी, लगोरी, कांच्या गोळ्या या खेळांसह अनेक खेळांचा यामध्ये समावेश होताय. आज पातुर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात या मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. शहरातील किड्स पॅराडाईज शाळेत हा कार्यक्रम झालाय. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पातुर मधील रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष प्राध्यापक शंकरराव नागरे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे उपस्थित होते. या कार्यक्रमाला मंडळाचे कार्यकर्त्यांनी महिलांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी शोधिसी मानवा हे गाणं गायलं. बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर श्री. खडकेश्वर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी चषकासह मोठ्या प्रमाणात जल्लोष केलाय. यावेळी महिलांनी फुगड्याही घातल्यात.