Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 22 जुलै 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पूरही ओसरला.
भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगावाला अतिवृष्टीमुळे नदीचं स्वरुप, अनेकांच्या घरात पाणी, लाखांदूर तालुक्यातील ओपरा गावातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत.
सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली, पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांचे आदेश.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरु ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरु नये, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना.
वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा पावसाचा यलो अलर्ट, नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन.