Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 26 जुलै 2024 : ABP Majha
मुंबईत पहाटेपासून पावसाची विश्रांती, आज मुंबईतल्या शाळांना सुट्टी नाही, रेल्वे रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत
कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा, कॉलेजला आज सुट्टी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती, कर्नाळ रस्ता पाण्याखाली, पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला, कोयना धरणातून २० हजार क्युसेकने विसर्ग सुरूच
मुसळधार पावसामुळे झालेलं नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आज दुपारी मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार
विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला
नांदेडमधील आसना नदी दुथडी भरून वाहू लागली
साताऱ्यात बोपर्डीमध्ये भिंत कोसळली
Maharashtra Rain Update News : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा अंदाज.
निलेश लंकेंच उपोषण चौथ्या दिवशी सुटले
भरपावसात अकोल्यात शिवशाही बसला भीषण आग