Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 19 जुलै 2024 : ABP Majha

Continues below advertisement

लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा. 

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार, मात्र १० ते ११ या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल. 

केंद्रीय निवडणूक आयोगाचा ठाकरेंना दिलासा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारण्यास परवागनी, राजकीय पक्ष म्हणून निधी स्वीकारता येणार. 

मुंबईत आज काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक, काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार. 

महाराष्ट्र प्रभारींच्या उपस्थितीत दोन दिवस भाजप कोअर कमिटीची मॅरेथॉन बैठक, काल झालेल्या बैठकीत तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्यावर चर्चा झाल्याची रावसाहेब दानवेंची माहिती. 

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज, पक्षाकडून विधानसभा निवडणूक निरिक्षक आणि प्रभारींची नियुक्ती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram