Beed : माजलगावचं धरण शंभर टक्के भरलं! बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात पाण्याची चिंता मिटली
Continues below advertisement
बीड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील छोटे व मोठे प्रकल्प हे पाण्यानं भरले आहेत. या पावसाने सिंदफना नदीला पूर आल्याने माजलगाव चे धरण देखील 100 टक्के भरल असून बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण देखील पहाटे पाण्याने पूर्ण भरला आहे आणि आता धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. त्यामुळे बिंदुसरा नदीकाठच्या लोकांना बीड नगर परिषदेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement