Swatantra Veer Savarkar Movie : स्वा. सावरकरांच्या बायोपिकमधून Mahesh Manjrekar यांची माघार
abp majha web team
Updated at:
10 Aug 2023 12:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका रणदीप हुड्डा साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रणदीपच्या हुड्डाच्या आधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती. परंतु, काही काळानंतर अचानक महेश मांजरेकरांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. याबाबत त्यांनी नुकत्याच ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.