Mahesh Gaikwad PC : गोळीबाराचा थरार सांगाताना महेश गायकवाडांनी थांबवली पत्रकार परिषद ABP Majha

Continues below advertisement

Mahesh Gaikwad PC : गोळीबाराचा थरार सांगाताना महेश गायकवाडांनी थांबवली पत्रकार परिषद ABP Majha
गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना डिस्चार्ज, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सुरू होते उपचार
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकात गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामधल्या जमिनीच्या वादाचं प्रकरण दोन फेब्रुवारीला पोलीस स्थानकात पोहोचलं होतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये या प्रकरणाची दखल घेण्यात येत असताना, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकातच अचानक गोळीबार केला होता. त्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram