Mahesh Chivte Attack | महेश चिवटेंवर प्राणघातक हल्ला, शिवसेनेमधील वाद विकोपाला

Continues below advertisement

करमाळा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. हल्ल्यानंतर महेश चिवटे यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. करमाळा परिसरातील शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महेश चिवटे यांच्यावरील हल्ला हा या वाढत्या वादाचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

करमाळा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) ओएसडी मंगेश चिवटेंच्या (OSD Mangesh Chivte) भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी झाला प्राण घातक हल्ला झाला आहे. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. (DCM Eknath Shindes OSD Mangesh Chivtes brother Mahesh Chivte was attacked in Karmala)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola