Amravati Paratwada : अमरावतीत 3 क्राईम ब्रँचची कारवाई फसली? ताब्यात संशयित सोडून देण्याची नामुष्की

Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यामध्ये तीन शहरांच्या क्राईम ब्रांचला नामुष्की सहन करावी लागली आहे. मुंबई, नागपूर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी रात्री छापे टाकत तेरा जणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये बिश्नोई गँगशी संबंधित मोस्ट वॉन्टेड कुणाल राणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, ताब्यात घेतलेल्यांमध्ये कुणाल राणा नाही हे लक्षात आल्यावर सगळ्यांना सोडून देण्याची वेळ पोलिसांवर आली. अमरावती ग्रामीण पोलिसांनी परिपत्रक काढत याची कबुली दिली आहे. "ताब्यामध्ये घेतलेल्यांमध्ये कुणाल राणा ही व्यक्ती अपेक्षित आरोपी नव्हता असं निष्पन्न झालं आहे," असे पोलिसांनी स्पष्ट केले. ताब्यामध्ये घेतलेल्या आरोपींकडे शस्त्रं असल्याच्या संशयावरून पोलिसांनी वॉर्निंग शॉट फायरही केले होते. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola