Mahendra Thorve vs Dada Bhuse : महेंद्र थोरवे-दादा भुसे भिडले; भरत गोगावले,शंभूराज देसाईंची मध्यस्थी
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणातली धक्कादायक बातमी... अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आज विधिमंडळात धक्कादायक प्रकार घडला. लॉबीत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचेच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात राडा झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना दूर केलं. मात्र शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांत झालेल्या या धक्काबुक्कीमुळे लॉबीत खळबळ माजली. आपल्या एका कामासंदर्भात विचारणा करण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे करत असताना दोघांत वाद पेटला आणि धक्काबुक्की झाली.
Continues below advertisement