BMC Election : मुंबई पालिकेवरून महायुतीत ठिणगी, भाजप 'मिशन १५०'वर ठाम

Continues below advertisement
लवकरच होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून वाद उफाळून आला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) 'मिशन १५०' जागा लढवण्याचे ध्येय ठेवले आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना समान जागांसाठी आग्रही आहे. 'आम्हाला लोकसभेला सात जागा मिळणार म्हणत होते, पण तेरा मिळाल्या,' असं सूचक वक्तव्य शिंदे गटाकडून करण्यात आले आहे, ज्यामुळे वाटाघाटी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप शिंदे गटाला ६५ ते ७५ जागा देण्यास अनुकूल आहे, मात्र शिंदे गट समान वाटपावर ठाम असल्याने यावर एकमत कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असं असलं तरी, दोन्ही पक्ष एकमेकांना सन्मान देऊन जागावाटप करतील आणि कटुता येणार नाही, असा विश्वासही शिंदे गटाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola