Mahayuti Seat Sharing: 'आपली ताकद असेल तिथे माघार नको', स्थानिक निवडणुकीवरून BJP आक्रमक

Continues below advertisement
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभारींच्या बैठकीत, जिथे पक्षाची ताकद आहे तिथे माघार न घेण्याच्या आणि समसमान जागांसाठी आग्रही राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 'राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती यामध्ये भाजपा महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा मला विश्वास आहे', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ज्या ठिकाणी युती होणार नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढती करण्याचाही विचार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola