NCP vs NCP: स्थानिक निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? Chandgad मध्ये युती, Sunil Tatkare म्हणतात 'चर्चा नाही'
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. यानंतर जळगावमध्येही शरद पवार गटाने अजित पवार आणि शिंदे गटासोबत युती करण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. यावर शरद पवार गटाने भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, 'भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तो घेण्याचा अधिकार आम्ही जिल्ह्यातील प्रमुखांना दिलेला आहे'. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र अशा कोणत्याही चर्चेबाबत कल्पना नसल्याचे म्हटले आहे आणि महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाण्यावर भर असल्याचे सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement