Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी Mahayuti चा फॉर्म्युला ठरल्याचा उदय सामंत यांचा दावा
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. 'आमचा फॉर्म्युला जसा विधानसभेला सक्सेस झाला, यशस्वी झाला त्याच्यापेक्षा किंबहुना दुपटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वी होईल,' असे सामंत म्हणाले. हा फॉर्म्युला गोपनीय असून तो केवळ महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनाच माहिती आहे. स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी, त्यावर तोडगा काढण्याचा आणि अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ याच तीन नेत्यांना असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने आम्ही स्वबळाचा नारा देऊ शकत नाही, पण सर्व विचार करूनच निवडणुकीत उतरणार असल्याचे सामंत यांनी नमूद केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement