Mahayuti Election: राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, सामंतांचा हल्लाबोल

Continues below advertisement
महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सामंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार टीका केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यामधून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होतं', असा जहरी टोला सामंत यांनी धाराशिवमधील एका कार्यक्रमात लगावला. अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असूनही त्यांना सोबत घेण्याचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. त्यांनी भाजपवर (BJP) नाव न घेता निशाणा साधत, 'गरज नसताना त्यांना सोबत का घेतलं?', असा सवाल उपस्थित केला. या विधानामुळे महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola