Mahayuti Rift: 'महायुतीच्या काळात आमदारांना फुटकी कवडीही मिळाली नाही', Kishor Patil यांचा भाजपला घरचा आहेर
Continues below advertisement
पाचोरा-भडगावचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी निर्धार मेळाव्यातून थेट मित्रपक्ष भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे, ज्यामुळे महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. 'महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही', असा गंभीर आरोप करत किशोर पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. एवढेच नाही, तर बंडखोरी करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आणि त्यांना पदे देऊन शाबासकी देत असल्याचा दावाही त्यांनी केला. पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून, महायुतीमधील मतभेद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement