Kishor Patil On Ladki Bahin : 'एक वर्षात एक फुटकी कवडी मिळाली नाही' आमदार Kishore Patil यांचा भाजपवर हल्लाबोल

Continues below advertisement
जळगावच्या पाचोरा मतदारसंघातील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी निर्धार मेळाव्यातून मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केल्याने महायुतीतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ‘बांधवांनो एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेली नाहीये,’ असा थेट आरोप करत पाटील यांनी निधी वाटपावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता केवळ पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच आपला एकमेव आधार असल्याचं ते म्हणाले. पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या विकासासाठी ५० टक्के निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पदे देऊन शाबासकी दिली, असा आरोपही पाटील यांनी केला. याचसोबत, १५०० रुपयांचे मानधन २१०० रुपये करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola