Mahayuti Rift: 'भाजपला एकला चालवण्याची हौस आली आहे', Arjun Khotkar यांची जालन्यातून टीका
Continues below advertisement
जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. भास्करराव अंबेकर यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाला बळकटी मिळेल, असे सांगतानाच खोतकर यांनी भाजपच्या एकला चलो रे भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. 'त्यांना वाटतंय की आता फार काही आम्ही मोठे झालोत, पण त्यांना आता एकला चालवण्याची हौस या ठिकाणी आलेली आहे,' असे म्हणत अर्जुन खोतकर यांनी भाजपला युतीधर्माची आठवण करून दिली. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासह भाजप नेत्यांशी युतीबाबत चर्चा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. जागावाटपावर बोलणीही होत नसल्याने, वेळ आल्यास शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement