Kartiki Ekadashi Eknaht Shinde Fugdi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढपुरात एकनाथ शिंदेंनी खेळली फुगडी

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये (Pandharpur) कार्तिकी एकादशीची (Kartiki Ekadashi) शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी बोलताना, 'वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरता दर्शन मंडप उभारणार,' अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उपमुख्यमंत्री शिंदे हे या सोहळ्यासाठी शनिवारपासूनच सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले होते. त्यांनी पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा केली. यानंतर त्यांनी कीर्तनाचा आनंद घेतला आणि कार्यकर्त्यांसोबत भजनावर ठेकाही धरला. राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola