Mahayuti Politics : महायुतीत स्वबळावरून संघर्ष, स्थानिक नेते विरुद्ध वरिष्ठ

Continues below advertisement
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून संघर्ष पेटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईत एकत्र लढण्याचे संकेत दिले असताना, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र स्वबळाची भाषा केली जात आहे. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख (Ravikiran Deshmukh) यांच्या मते, 'स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ती निवडणूक त्यांच्या मर्जीप्रमाणे झाली पाहिजे.' मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) ठाकरे बंधूंच्या विरोधात लढताना एकत्र राहणे महत्त्वाचे असले तरी, ठाण्यासारख्या (Thane) ठिकाणी अनेक वर्षे दुय्यम भूमिकेत असलेला भाजप (BJP) आता आपले अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतंत्रपणे लढण्यास उत्सुक आहे. तीच परिस्थिती एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आहे, जिथे भाजपला आपला झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांची रणनीती आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या राजकीय इच्छा-आकांक्षा यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola