Maharashtra : Kankavli त दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर फूट, Uddhav Thackeray यांनी प्रस्ताव नाकारला

Continues below advertisement
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला रोखण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाने एकत्र येऊन 'शहर विकास आघाडी' स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र या प्रस्तावाला शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नकार दिला आहे. आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांना या आघाडीची गरज पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. उद्धव ठाकरे यांनी 'भाजपविरुद्ध सर्वपक्षीय एकत्र येण्याचा प्रस्ताव' फेटाळल्याने कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आता मावळली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola