Mahayuti Meeting : महायुतीची आज महत्त्वाची बैठक, महामंडळ वाटपावर होणार चर्चा ABP MAJHA

महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत प्रवेशावरून महायुतीतील नेत्यांमध्ये चर्चा झाली. महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी उद्भवू नये यासाठी समन्वय समितीत चर्चा झाली. यापूर्वी रायगड, सातारा, सांगली या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रवेश दिल्यानं शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेले महामंडळांचे वाटप अंतिम टप्प्यात आहे, त्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महायुतीत 'मिटाचा खडा' पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. "महायुतीत सर्व काही अलबेल आहे असंच समोर जावं" या अनुषंगाने आज खरंतर प्रामुख्याने महत्त्वाची बैठक झाली. मित्र पक्षातल्या व्यक्तींना प्रवेश देताना समन्वय समितीमध्ये चर्चा व्हावी आणि त्या व्यक्तीला प्रवेश द्यावा की न द्यावा यावर निर्णय व्हावा, यावर भर दिला गेला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तीनही पक्षांमध्ये एकसंगतता राहावी यासाठी पावले उचलली जातील. चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रसाद लाड, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, राहुल शेबाळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटील आणि धनंजय मुंडे हे नेते या बैठकीत सहभागी होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola