Mahayuti : महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी लोकसभा प्रभारी मैदानात
Continues below advertisement
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी लोकसभा प्रभारी मैदानात मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघातल्या उमेदवारीवरून महायुतीत निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी भाजपचे लोकसभा प्रभारी मैदानात उतरणार आहे. भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी ईडी आणि सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावर भाजपवर जाहीर टीका केली होती. त्यानंतर भाजप आमदार अमित साटम यांनी गजानन कीर्तिकरांवर जाहीर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर, भाजप प्रभारी दिनेश शर्मा हे आज महायुतीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील. वायव्य मुंबई मतदारसंघातला महायुतीचा उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीनंही आजच्या बैठकीत आढावा घेण्यात येईल.
Continues below advertisement