Abdaul Sattar On Election : सिल्लोड नगरपरिषदेत स्वबळाची तयारी : अब्दुल सत्तार
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्यात महायुती म्हणून लढण्यावर भर देत असताना, सिल्लोडमध्ये (Sillod) मात्र शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये (BJP) मोठी दरी निर्माण झाली आहे. 'राज्यात काय व्हायचं ते होऊ द्या सिल्लोड मध्ये स्वबळावर लढू', अशी भूमिका शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. यासोबतच भाजपला एकतरी नगरसेवक निवडून आणून दाखवा, असे थेट आव्हानही देण्यात आले आहे. याला उत्तर देताना भाजपने मतदार यादीतील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. मयत लोकांच्या नावावर निवडून न येता, मतदार यादीतील घोळ दूर करून निवडणूक जिंकावी, असे आव्हान भाजपने शिवसेनेला दिले आहे. सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधील हा स्थानिक संघर्ष आता विकोपाला गेला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement