Parinay Fuke vs Bachchu Kadu : निवडणूक हरल्यानंतर बच्चू कडूंची स्टंटबाजी : परिणय फुके

Continues below advertisement
नागपुरात बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून (Farmer Protest) राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी या आंदोलनावर सडकून टीका केली आहे. 'बच्चू कडू निवडणूक हरल्यानंतर थोडी स्टंटबाजी करत आहेत,' असे फुके म्हणाले. फुके यांनी म्हटले की, सरकार चर्चेसाठी सकारात्मक असून शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे. कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, कांद्याला हमीभाव आणि दूध दर वाढवणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. कर्जमाफी निश्चितपणे होणार आहे, पण त्याला एक वर्षाचा कालावधी लागेल, असे आश्वासनही फुके यांनी दिले. कायदा सुव्यवस्था हातात न घेता बच्चू कडूंनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola