Jalgaon : वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर ग्राहकाचा प्राण घातक हल्ला

जळगावच्या सिंधी कॉलनी परिसरात वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर ग्राहकानेच हल्ला केलाय. टिकमदास पोपटणी यांच्या थकीत बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी महावितरणच्या पथकाशी वाद घातला. यावेळी झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर थेट मारहाणीत झालं. मात्र स्थानिक आणि इतर महावितरण कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी पोपटाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola