MVA Protest Trailer : मविआच्या महामोर्चाच्या स्फोटक ट्रेलर, भाजपच्या नेत्यांवर निशाणा ABP Majha
Continues below advertisement
Mahavikas Aghadi Mahamorcha : राज्यातील विविध प्रश्नांवरुन महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. महाविकास आघाडीला उद्याच्या मोर्चासाला पोलिसांनी काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. परंतु, मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे.
Continues below advertisement