Rain Maharashtra : राज्यात पुढील 4 ते 4 दिवस कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज...
राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रतीक्षेनंतर अवतरलेली थंडी गायब झालीय. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडवली.अनेक ठिकाणी भात शेती कापलेली भिजली. त्यामुळे भातशेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.