Maharashtra Winter Session : अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया जाणार? निलंबनानंतर विरोधक आक्रमक

जयंत पाटील यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलंय. सत्ताधारी आणि विरोधकांमधला हा सामना आजही रंगण्याची चिन्ह आहेत. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्याचसोबत विरोधकांनी प्रतिसभागृह करण्याचं ठरवल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे, महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवर आजही चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादात अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया जाण्याची शक्यता अधिक आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola