New Projects in Maharashtra : राज्याला मिळणार नवे दोन प्रकल्प, पाहा कुठे उभारणार प्लांट
वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क असे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येतोय.. असं असतानाच आता महाराष्ट्रात नवे प्रकल्प येणार आहेत... राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला पंतप्रधान मोदींनी गिफ्ट दिलंय.. पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा करण्यात आलीय. या प्रकल्पाअंतर्गत 2 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असून 5 हजार रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येतोय.. 297 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.. सीडॅकचा इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार आहे.. या प्रकल्पाची किंमत एक हजार कोटी असणार आहे.. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही घोषणा केलीय.. दिल्लीतील अधिकारी नुकतंच पुण्यात येऊन गेले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चाही केली.