Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल, तापमानाचा पारा घसरल्याने अनेक भागात थंडी
सध्या राज्यात थंडीची चाहुल लागायला सुरुवात झालीय. धुळे शहरासह जिल्ह्यात देखील रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. तर तिकडे विदर्भातही थंडी चांगलीच वाढू लागलीय. नागपुरात 15 अंश सेल्सिअस वर गेलाय. त्यामुळे नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद लुटतायत. तर अहमदनगर जिल्ह्यातही थंडी वाढू लागल्याने कपाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर निघू लागेलत...नगर शहरात सकाळच्या टप्प्यात तापमानाचा पारा 16 ते 18 अंशावर दिसून आहे, गुलाबी थंडीचा आनंद घेत नगरकर मॉर्निंग वॉक करताना दिसत आहेत.