Maharashtra Weather : राज्यभर थंडी वाढली, अनेक ठिकाणी तापमान घसरलं
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Weather : नोव्हेंबर महिना सरत आला आणि राज्यभर थंडीचा प्रवेश झालेला दिसतोय.... अनेक ठिकाणी तापमान घसरलं. महाबळेश्वरात तापमान ११ अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक ६ अंशांवर घसरलंय. तिकडे धुळ्यातही तापमानात घट झालेय. धुळ्यात तापमान 8.2 अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. नाशकात या मोसमातील निचांक तापमान म्हणजेच १०.४, तर निफाडमध्ये ८. ०१ तापमानाची नोंद झालीय. तिकडे पुण्यातही थंडीची चाहुल लागल्यानं पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत... सकाळच्या व्यायामानंतर वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर गर्दी करताना दिसतायत. रबी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला