Maharashtra water supply : राज्यातल्या पाणीसाठ्यात गेल्या महिनाभरात 10 टक्क्यांची घट ABP Majha

Continues below advertisement

 गेल्या १२१ वर्षातले रेकॉर्ड्स तोडत मार्च महिना सर्वाधिक उष्ण महिना ठरला... याचे परिणाम राज्यातल्या पाणीसाठ्यावर दिसून आले आहेत.. राज्यातल्या एकूण पाणीसाठ्यात एकट्या मार्च महिन्यात तब्बल १० टक्क्यांनी घट झाली आहे.. यंदा पाऊस चांगला झाल्यानं राज्यात फेब्रुवारी अखेरीस ७० ते ७५ टक्के पाणीसाठा होता. मार्च अखेरीस उपयुक्त पाणी साठा ६१ टक्क्यांवर आलाय. उन्हाच्या झळा तीव्र राहिल्यानं पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं तसंच शेतीसाठी पाण्याचा मोठा वापर झाला.  त्यामुळे पाण्यात ही मोठी घट झाली आहे.. राज्यभराचा विचार करता नागपूरला पाण्याची चिंता सतावण्याची शक्यता आहे.. कारण नागपुरात सर्वात कमी म्हणजे ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.. तर पुण्यात सर्वाधिक ६८ टक्के पाणी शिल्लक आहे. मात्र उष्णतेची लाट कायम राहिल्यास पाणीसाठा वेगानं घटण्याची भीती आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram