Maharashtra water scarcity : जलस्त्रोतांच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर,तीव्र पाणीटंचाईची शक्यता
Continues below advertisement
देशातील पहिला जलविषयक गणना अहवाल केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाने नुकताच प्रसिद्ध केला असून त्यानुसार देशभरात तब्बल 24 लाख 24 हजार 540 नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्त्रोत आहेत. मात्र त्यापैकी फक्त 97 हजार जलस्त्रोत महाराष्ट्रात असून जलस्त्रोतांच्या बाबतीत महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत बराच पिछाडीवर आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा भूभाग 9.36% असूनही देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात फक्त 4% जलस्त्रोत असल्याने महाराष्ट्र नेहमीच दुष्काळाच्या छायेत असल्याचं या अहवालातून समोर आलंय. महाराष्ट्रात सुमारे 50 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असताना महाराष्ट्रातील एकूण जलस्त्रोतांपैकी तब्बल 99% जलस्त्रोत ग्रामीण भागात आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील शहरी भागात तीव्र पाणीटंचाईची शक्यता अहवालातून समोर आली आहे.
Continues below advertisement