Maharashtra Water Scarcity: राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण, भीषण पाणी टंचाईची समस्या

Continues below advertisement

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची  धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावं लागतंय.. यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसल्याने जिल्ह्यातील जलाशयात पाणीसाठा आधीच कमी झाला होता. त्यातच राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होतेय. मात्र टँकरने जरी पाणीपुरवठा वाढला असला तरी अनेक वाड्या आणि गावांत पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होताना दिसतायत.. सध्या राज्यातील ७ हजार ४९५ गावं आणि वाड्यांमध्ये २ हजार ७३७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जातोय. सर्वात भीषण म्हणजे सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ २८.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पांत ३७.४४ आणि लघू पाटबंधारे प्रकल्पांत २९.९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.  दरम्यान  मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली असून, सर्वाधिक टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram