Maharashtra Infrastructure Projects | War Room मध्ये 33 Project चा आढावा, Metro, Coastal Road ला गती!
वॉर रूममध्ये महाराष्ट्रातील तेहेतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सचा आढावा घेण्यात आला. यापूर्वी २१ एप्रिल रोजी झालेल्या वॉर रूम बैठकीत १३२ विषय प्रलंबित होते. त्यापैकी या बैठकीपर्यंत त्रेसष्ठ अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. उर्वरित अडचणी पुढच्या वॉर रूम बैठकीपर्यंत सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एमएमआर विभागातील मल्टी मॉडेल कॉरिडॉर, GMLR, प्रमुख Metro Project (ठाणे, भिवंडी, कल्याण, वडाळा, कासरवडवली, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी, अंधेरी ते एअरपोर्ट, दहिसर ते मीरा भाईंदर, अंडरग्राउंड Metro Three) यांच्या अडचणी सोडवून पूर्णत्वाची तारीख निश्चित करण्यात आली. BDD चाळीच्या कामाचा आढावा घेऊन अडचणी दूर केल्या. पहिल्या टप्प्याच्या BDD चाळीच्या चाव्या लवकरच देण्याचा निर्णय झाला. शिवडी वरळी एलिव्हेटेड Road च्या अडचणी पुढच्या एक ते सव्वा महिन्यात दूर करून एका वर्षात काम पूर्ण करण्याचे ठरले आहे. बोरिवली-ठाणे Twin Tunnel च्या अडचणी संपल्या असून, टनेल बोरिंग मशीन्सचा प्रवेश झाल्यावर दोन वर्षांत काम पूर्ण होईल. Coastal Road चा (बांद्रा वर्सेवा ६३ टक्के पूर्ण) आढावा घेतला. वर्सेवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर असे सहा टप्पे सुरू झाले आहेत. माघाटणे-गोरेगाव DP Road, गोरेगाव आणि मुलुंड Flyovers, Orange Gate Tunnel चे प्रश्न दूर झाले. वाढवण बंदर आणि वाढवण एअरपोर्टचा आढावा घेतला. वर्धा नांदेड Railway Project, वडसा गडचिरोली Railway Project, जालना नांदेड समृद्धी कॉरिडॉरमधील भूसंपादनाचे प्रश्न सोडवले. पुणे Ring Road आणि पुणे Metro Rail च्या वाढीव टप्प्यांना गती देण्याचा निर्णय झाला. "जे तेहेतीस Project आपण घेतलेले आहेत ते सगळ्याचा सगळे Project वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकलो."