Eknath Shinde Hingoli Kawad Yatra | मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा, शिंदे होणार सहभागी!
Continues below advertisement
मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा आज हिंगोलीमध्ये पार पडत आहे. दरवर्षी दुसऱ्या श्रावणी सोमवारी संतोष बांगर ही कावड यात्रा काढतात. कळमनुरी इथे या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात शिवभक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. ही कावड यात्रा संध्याकाळी पाचच्या दरम्यान हिंगोलीमध्ये पोहोचेल. पाच वाजता या कावड यात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी होणार आहेत. "प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते हिंगोलीमधल्या या कावड यात्रेला," असे प्रतिनिधीने सांगितले. या यात्रेमुळे हिंगोलीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवभक्तांचा मोठा सहभाग हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
Continues below advertisement