Maharashtra: विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट सामना! ABP Majha

विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने उभे ठाकलेत. नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. नागपुरात काँग्रेसनं काल ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिलं आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होतोय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola