Maharashtra : विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा समावेश
विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत शिवसेनेच्या अंबादास दानवे आणि अनिल परब यांचा समावेश करण्यात आलाय. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाला स्थान मिळालेलं नाही. तिथं शिंदे गटाला स्थान देण्यात आलंय. पण विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत मात्र ठाकरे गटाला स्थान आहे. विधान परिषदेच्या समितीत मात्र मुख्यमंत्री शिंदे यांचा समावेश असला तरी त्यांच्या गटाचा विधान परिषदेचा कोणताही सदस्य नाही.