
Maharashtra Vaccination Drive : पहिल्या डोसबाबत 100 टक्के लसीकरणाचा निर्धार : CM Uddhav Thackeray
Continues below advertisement
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यातच राज्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. पहिल्या डोसबाबत १०० टक्के लसीकरण व्हावे असं उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्यात १०० टक्के लसीकरण व्हावं असं उद्दिष्ट देण्यात आलंय. तसंच कोरोनाची साथ अद्याप गेलेली नाही. लस घेतलेल्यांना कोरोना संसर्गाची कमी भीती आहे. शिवाय त्यांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झालंय. त्यामुळे नागरिकांनीही टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय.
Continues below advertisement